Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या वन डे, टी-20 मालिकेतून वगळलं
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, रिद्धीमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकर युवा गोलंदाज शार्दूल ठाकूरचाही या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
ईशांत शर्मालाही अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनी या कसोटीतून आराम देण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्ध त्रिशतक ठोकणाऱ्या करुण नायरचंही भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.
नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे.
एकीकडे अजिंक्य रहाणेवर अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्याचा इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात समावेश करण्यात आलेला नाही. अंबाती रायडू आणि श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेत संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. बंगळुरुत 14 ते 18 जूनदरम्यान हा सामना खेळवण्यात येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -