Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमेरिकेच्या रस्त्यांवर अनुराग कश्यप कोणत्या मुलीच्या बुटाचे लेस बांधतोय?
अनुरागचे पहिले लग्न आरती बजाजसोबत झाले होते. या दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाल्याने त्यांचा घटस्फोट झाला. आलिया ही अनुराग आणि आरतीची मुलगी आहे. या दोघांचा घटस्फोट होऊनही बाप-लेकीच्या नात्यामधील ओलावा आजही कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे भारतापासून ते पाकिस्तानपर्यंत सर्वत्रच ऑनर किलिंगचा प्रश्न गंभीर होत आहे. तर दुसरीकडे हे फोटो नात्यातील बंध उलगडून सांगत आहेत.
या फोटोमुळे वडील आपल्या मुलीची अशी सेवा कधी केली हा प्रश्न विचारला जात आहे.
एकीकडे तोकड्या कपड्यांमुळे मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. तर दुसरीकडे पाकिस्तानात दोन दिवसांपूर्वी आपल्या सख्या बहीणीचा गळा दाबून तिच्या भावानेच हत्या केली. अशा समाजात अनुराग कश्यपने सर्वांसमोरच आदर्श ठेवला आहे, असे म्हणावे लागेल.
हा फोटो पाहिलात, बॉलीवूड स्टार अनुराग कश्यप एका मुलीच्या बुटाची लेस बांधत आहे. पण ही मुलगी कोण आहे? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. ही मुलगी दुसरी कोण नसून तर अनुरागची मुलगी आलिया आहे. अनुराग सध्या यूएसमध्ये आपल्या लेकीसोबत सुट्टी ऐन्जॉय करतो आहे. एके ठिकाणी तिच्या बुटाची लेस निघाली होती. त्यावेळी अनुरागने स्वत: खाली रस्त्यावर बसून आलियाच्या बुटाची लेस बांधली. अलियाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये, मुलीच्या आयुष्यात आपल्या पित्याचे महत्त्व किती असते हे सांगितले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -