मनोरंजन विश्वाने 2016 मध्ये गमावलेले मोहरे
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं 4 जून 2016 रोजी राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 80 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांतता! कोर्ट चालू आहे, चौकट राजा या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मागील एक-दोन वर्षात आलेल्या विहीर, हापूस या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेते राजेश विवेक यांचं 14 जानेवारी 2016 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आमीर खानच्या 'लगान' या सिनेमातील त्यांची गुरन बाबा ही भूमिका अतिशय गाजली होती.
एफआयआर सारख्या मालिकांतून गाजलेले अभिनेते सुरेश चटवाल यांचा 29 मे 2016 रोजी मृत्यू झाला. काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते रजाक खान यांचा एक जून 2016 रोजी कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यांनी जवळपास 90 हून जास्त बॉलिवूडपटांमध्ये भूमिका केली होती.
‘बालिका वधू’ फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या केली. मुंबईच्या गोरेगावमधील राहत्या घरी तिने गळफास घेतला. तिला अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांमुळे ती डिप्रेशनमध्ये होती. त्यातूनच प्रत्युषाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला होता. मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला सकाळी रावल यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाची स्थिती पाहता त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.
प्रख्यात अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी निधन झालं. 23 ऑक्टोबर 2016 रोजी भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. नाट्यत्रिविधा कार्यक्रम सुरु असताना शेवटच्या भैरवीसाठी उभ्या असताना अश्विनी एकबोटे स्टेजवरच कोसळल्या. त्यांना तातडीने जवळच्या गोरे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -