तु दबे पाँव चोरी छुपे से ना आना , सामने से वार कर, फिर मुझे आझमाना : पंकजा मुंडे
समर्थकांकडे पाहत प्रीतम मुंडे म्हणाल्या, मला वाटलं फक्त मोठ्या भावजींचाच (पंकजा मुंडे यांचे पती) फॅन फॉलोईंग आहे. जानकर साहेब, तुम्ही आता माझ्या नवऱ्यालाही रासपमध्ये घ्यायला हरकत नाही, असं म्हणताच एकच हशा पिकला. प्रीतम मुंडेंनी त्यांचे पती गौरव खाडे यांनी उभं राहून हात करण्याची विनंती केली. महादेव जानकरांनीही गौरव खाडे यांनी उचलून घेतलं. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रीतम मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात होताच एक असा किस्सा झाला, ज्याने एकच हशा पिकला. प्रीतम मुंडे भाषणाच्या सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांची नावं घेत होत्या. प्रीतम मुंडेंनी त्यांची आई, सासू आणि नंतर नवऱ्याचंही नाव घेतलं. पण नवऱ्याचं नाव घेताच उपस्थित समर्थकांनी मोठा आवाज केला.
खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडाहून भव्य रॅली काढली आणि रस्त्यामध्ये हजारोंच्या संख्येने समर्थक या रॅलीमध्ये सहभागी झाले. सावरगावात पंकजा मुंडेंनी समर्थकांना संबोधित केलं. त्याआधी प्रीतम मुंडे यांचंही भाषण झालं.
तु दबे पाँव चोरी छुपे से ना आना , सामने से वार कर, फिर मुझे आझमाना, या पंकजा मुंडेंच्या भाषणातील वाक्यानेही उपस्थितांची दाद मिळवली.
मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे. जनतेच्या हिताचं सरकार आणणं माझं कर्तव्य आहे, कुठल्या पदावर बसणं हे कर्तव्य नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
गुप्त सर्व्हे झाले म्हणता, त्यामध्ये प्रितम मुंडे धोक्यात असल्याचं सांगितलं जातं. पण तुमचा सर्व्हे तुमच्या समोर आहे. 2019 मध्ये इथे विजयाचीच घंटा वाजेल. असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला. तसेच, सर्व्हे बघून कोणी तिकीट देत नाही, माणसं बघून तिकीट देतात, असेही त्या म्हणाल्या.
उद्याचा दिवस मावळायच्या आत 'ऊसतोड कामगार महामंडळ' स्थापन करुन, त्याची घोषणा करणार आहोत. ऊसतोड कामगारांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करुन घेतला आहे., अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून दिली. तसेच, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी मी संघर्ष करेन. प्रसंगी ऊसतोड कामगारांसाठी रानात कोयता घेऊन जाण्यासही तयार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
तोडपाण्याची कामं आम्ही करत नाही. सत्तेत असो वा विरोधात, आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं., असा टोला धनंजय मुंडेंना लगावत, त्या पुढे म्हणाल्या, यांनी हौद तरी बांधला काय? फर्लांगभर रस्ता तरी बांधला का?
यावेळी पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या गडाचं नावही जाहीर केलं. भगवानगड जसा भगवानबाबांची कर्मभूमी, तशी सावरगाव भगवानबाबांची जन्मभूमी आहे. म्हणजेच त्यांच्या भक्तीचा गड आहे. म्हणून या गडाचं नाव 'भगवानभक्ती गड'. अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.
तोडपाण्याची कामं आम्ही करत नाही, असे म्हणत ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. बीडमधील सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी उपस्थित जनतेशी संवाद साधला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -