71वा प्रजासत्ताक दिवस : राजपथावर चित्ररथांचे अनोखे प्रदर्शन, महान संस्कृतीचे दर्शन
उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर, राज्यातील सांस्कृतिक कला आणि धार्मिक पर्यटन दाखवण्यात आले. यात गंगा-यमुना वाहताना दाखवण्यात आल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेलंगणाच्या चित्ररथावर बतुकम्मा देवीची मूर्ती साकारण्यात आली होती. तसेच बतुकम्मा उत्सव देखील दाखवण्यात आला.
तामिळनाडूच्या चित्ररथावर आयन्नार देवतेची मूर्ती साकारण्यात आली होती. या देवीची मूर्ती वाईट प्रवृत्तीपासून रक्षण करते, अशी लोकांची धारणा आहे.
राजस्थानचा चित्ररथ परंपरा आणि संस्कृती यावर केंद्रित होता. यात गुलाबी शहर जयपूर आणि वास्तुकलेचे प्रदर्शन दाखवण्यात आले.
पंजाबच्या चित्ररथावर गुरुद्वाराला एका मजबूत स्तंभाच्या रुपात दाखवण्यात आले. किरत करो, नाम जपो हा सिद्धांत यातून देण्यात आला.
ओडिशाच्या चित्ररथावर भगवान शिव आणि भगवान विष्णू होते. भगवान लिंगाराजाची रुकुना रथ यात्रेची झलकही यावर पाहायला मिळाली. तर, कलाकार ओडिसी नृत्य करताना दिसले.
मेघालयातील चित्ररथावर निसर्गाशी माणसाने साधलेला ताळमेळ दाखवण्यात आला. इथे लोक झाडांच्या मदतीने पुल बांधतात ज्याला जिंगकिंग डिंगरी असं म्हणतात. निसर्गसंपन्न अशा या चित्ररथाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं.
मध्य प्रदेशचा चित्ररथ आदिवासी संस्कृतीवर केंद्रित होता. भिल्ल समाजातील स्त्रियांचा यात समावेश होता.
कर्नाटकच्या चित्ररथावर बसवेश्वराचे दर्शन आणि मंडप साकारण्यात आला होता.
जम्मू-काश्मीरच्या चित्ररथावर काश्मिरी घराची झलक पाहायला मिळाली. पारंपरिक कला संस्कृती आणि चलो गाव हा नाराही यात देण्यात आला.
कुल्लूचा प्रसिद्ध दसरा उत्सव हिमाचल प्रदेशच्या चित्ररथावर दिसत होता.
गुजरातच्या चित्ररथावर गाव साकरण्यात आलं होतं. हा चित्ररथ राणीच्या बावडीवर केंद्रीत होता.
गोव्याच्या चित्ररथाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. गोवा सरकार सध्या बेडूक वाचवा अभियान राबवित आहे. त्याच धर्तीवर बेडकाच्या हातात गिटार दाखवण्यात आली होती.
छत्तीसगडचा चित्ररथ यावेळी सर्वात पुढे होता. या रथावर नंदी व आदिवासी महिलेची मूर्ती साकरण्यात आली होती.
बांबू आणि वेतापासून बनवलेल्या वस्तू आसामच्या रथावर दिसत होत्या. सोबतच भोरताल नृत्याचंही सादरकरण करण्यात आले.
आंध्र प्रदेशच्या रथावर यंदा तिरुपती ब्रह्मोत्सवाची झलक साकारण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -