सलमानच्या ‘सुलतान’बाबत 5 रंजक गोष्टी
सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानला भेटण्यासाठी शाहरुख सेटवर पोहोचला होता. खरंतर शाहरुख-सलमानची भेट शूट करुन बिहाईंड द सीनमध्ये दाखवलं जाणार होतं. मात्र, आता या सीनलाही सिनेमाचा भाग करण्यात आला आहे. ज्यामध्ये पैलवान सुलताना सेलिब्रेटीला भेटताना दाखवण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘सुलतान’ सिनेमात काम करण्यासाठी सलमान खानने कोणतंही मानधन केलं नाही. मात्र, या सिनेमात सलमान खान हा यशराज फिल्म्ससोबत 50 टक्के भागीदार आहे. उदाहरणार्थ- सुलतान सिनेमाची कमाई 300 कोटी रुपये झाली, तर सलमानचे 150 कोटी रुपये आणि 150 कोटी रुपये यशराज फिल्म्सचे.
यश राज फिल्म बॅनरखाली बनलेला अभिनेता सलमान खानचा ‘सुलतान’ सिनेमा आज म्हणजे 6 जुलैला रिलीज होत आहे. पाहूया सलमानच्या ‘सुलतान’ सिनेमाबाबत 5 रंजक गोष्टी...
सलमान खानने सांगितलं की, सुलतान सिनेमातील अधिकाधिक फाईट्स या विनाकेबल आणि खऱ्याखुऱ्या पैलवानांसोबत आहेत.
सलमान खानने या सिनेमात हरियाणाच्या पैलवानाची भूमिका साकारली आहे. भूमिकेला साजेशी शरीरयष्टी करण्यासाठी सलमानला त्याचं वजन 95 किलो करावं लागलं होतं. त्यासाठी खास ट्रेनिंगही घेतली होती. सिनेमा करताना एवढी मेहनत घ्यावी लागली, की कधी-कधी सलमानला वाटे की सिनेमा साईन करुन चूक केलीय.
शूटिंगवेळी जेव्हा सलमानला लंगोट परिधान करायला सांगितलं गेलं, त्यावेळी त्याला थोडी लाज वाटत होती. मात्र, सिनेमाची ती गरज असल्याने तिथे सलमानचंही काही चाललं नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -