नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरले
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला आहे. कल्याणमध्ये आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचार डबे घसरल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी पाच ते सहा तास हा मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्हं आहेत.
A1, A2, A3 हे डबे घसरल्याचं एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी सांगितलं. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग कमी असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
एक्स्प्रेसचं इंजिन डब्यावरुन घसरुन उलट पडलं, तर एक्स्प्रेसचे डबे वीस फुटांवरील टेकडीवर जाऊन आदळले.
नागपूरहून मुंबईला येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन आणि चार डबे घसरले. आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -