पिंक जर्सी म्हणजे विजय, दक्षिण आफ्रिकेचा विक्रम अबाधित
यावेळीसुद्धा ही परंपरा कायम राहिली, सहा सामन्यांच्या मालिकेत जोहान्सबर्गमधील वॉन्डरर्स स्टेडियमवर यजमान संघाने भारताची आघाडी 1-3 ने रोखली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे हा गुलाबी युनिफॉर्म कायमच दक्षिण आफ्रिकेसाठी लकी ठरला आहे. आतापर्यंत पिंक जर्सी घातल्यावर एकदाही दक्षिण आफ्रिकेने सामना हरलेला नाही.
या सामन्यातून मिळालेला निधी शार्लोट मॅक्झेके जोहान्सबर्ग अकॅडमिक हॉस्पिटलच्या ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकला देण्यात आला.
2011 मध्ये पहिल्यांदा पिंक जर्सी घालून संघ मैदानात उतरला. तेव्हापासून ही सहावी वेळ आहे.
ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी दक्षिण आफ्रिकेने गुलाबी जर्सी घातली. यापूर्वीही अनेकदा पिंक जर्सीमध्ये ही टीम खेळली आहे.
जोहान्सबर्गमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी रंगाचा युनिफॉर्म घालून मैदानात उतरला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -