स्त्रियांपेक्षा पुरूषांना जास्त होतात हे आजार

कँसरसारख्या आजारांमुळे स्त्रिया आणि पुरूष दोघेही त्रस्त आहेत. बदलती जीवनशैली, अनुवंशिकता आणि अन्य काही कारणांमुळेही कँसरचा धोका पुरूषांपेक्षा जास्त स्त्रीयांना असतो. आज अशाच कँसरच्या काही प्रकारांबद्दल आम्ही आपल्याला सांगणार आहोत जे स्त्रियांपेक्षा जास्त पुरूषांना होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ल्युकेमिया : युरोपिअन जर्नल ऑफ कँसरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये जास्त जीवघेणा असल्याचे म्हटले आहे.

फुफ्फुसाचा कँसर : धुम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनाने फुफ्फुसाचा कँसर होऊ शकतो. नुकताच महिला स्मोकर्समध्ये वाढत्या कँसरच्या ग्राफ समोर आला होता, परंतु असे असले तरीही महिलांपेक्षा पुरूषांमध्ये या कँसरचे प्रमाण जास्त आहे.
कोलोरेक्टल कँसर (मोठ्या आतड्याचा कँसर) कोलोरेक्टल कँसरचा धोका स्त्री आणि पुरूष दोघांनाही सारख्याच प्रमाणात असतो. परंतु काही अभ्यासातून असंही समोर आलंय की, कोलोरेक्टल कँसरचा उपचार घेणाऱ्या स्त्रियांचे आयुर्मान पुरूषांपेक्षा जास्त असते.
किडनीचा कँसर : किडनीच्या कँसरचा धोका स्त्रियांपेक्षा पुरूषांना तिप्पट धोका असतो. धुम्रपान, अनुवंशिक आणि बदलती जीवनशैली ही कँसरची काही प्रमुख कारणं आहेत.
त्वचेचा कँसर : त्वचेच्या कारणांचा खुलासा अजून झाला नसला तरीही स्त्रिया आणि पुरूषांची त्वचा वेगवेगळी असल्यामुळे पुरूषांमध्ये कँसरचा धोका जास्त असतो.
प्रोस्टेट कँसर : प्रोस्टेट ग्लँड ग्रंथी केवळ पुरूषांमध्ये असल्यामुळे या प्रकारच्या कँसरचा धोका केवळ पुरूषांनाच असतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रोस्टेट कँसर हा एक सायलेंट किलर आहे, ज्याची माहिती बऱ्याचदा शेवटच्या स्टेजमध्येच कळते.
पचनसंस्थेचा कँसर : अक्यूट पँक्रियाटिक कँसरचा धोका स्त्रिया आणि पुरूष दोघांनाही सारख्याच प्रमाणात असतो. परंतु क्रॉनिक पँक्रियाटिक कँसर पुरूषांना मोठ्या प्रमाणात होतो. अल्कोहोल पँक्रियाटिक कँसर पुरूषांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार आहे.
काही आजार असे असतात जे केवळ महिलांनाच होतात. पण काही आजार असेही असतात जे पुरूषांसाठी जास्त घातक असतात. जाणून घ्या कोणते आहेत हे आजार..
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -