वेब सीरीज Scam 1992 मधील हर्षद मेहताची पत्नी अंजली बरोटची नव्या प्रवासाला सुरुवात, पहा फोटो
स्कॅम 1992 या वेब सीरिजमध्ये हर्षद मेहताच्या पत्नीची भूमिका साकारणारी अंजलीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अंजलीने 16 जानेवारीला आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंजलीने तिच्या लग्नाच्या निमित्ताने फिकट लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर तिचा नवरा गौरवने पांढरा शेरवानी घातला होता, जो त्याच्यावर खूपच सुंदर दिसत होता.
अंजलीने लग्नाचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंसह अंजलीने लिहिले की, 'आयुष्यभराचा चहा पार्टरन, मी तुझ्यावर खूप प्रेम करते.
अंजलीने मेहंदीपासून हळदी पर्यंत सर्व विधींचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंजली खूपच सुंदर दिसत आहे. अंजलीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो फारच आवडले आहेत.
अंजली आणि तिचा नवरा गौरव यांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आणि त्यांच्या नवीन नात्याचा आनंद दिसत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -