वारली हस्तकलेच्या छत्र्या बाजारात, कोरोना काळात कारागिरांना रोजगार!
त्यावर उपाय म्हणून या वारली पेंटिंग करणाऱ्या 450 तरुणांनी आदिवासी युवा सेवा संघाच्या माध्यमातून एकत्र येत पावसाळ्यात लागणाऱ्या छत्र्यांवर वारली पेंटिंग करुन त्यातून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्धार केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारपेठेतून छत्र्या विकत घेऊन हे तरुण या छत्रीवर वारली पेंटिंग करुन विक्री करतात. या छत्र्यांची किमंत 200 ते 500 रुपयांच्या घरात आहे.
देशातील आणि राज्यातील नागरिकांनी या छत्र्याखरेदी केल्या तर या गरजूंना रोजगार उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
शाळेतील विद्यार्थी ते तरुण हे सगळे यात समाविष्ट असून एका छत्रीसाठी यांना 80 ते 250 रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते.
पालघरमधील ग्रामीण भागातील सातासमुद्र पार गेलेल्या वारली पेंटिंग या हस्तकलेला मोठी मागणी असली तरी सध्या लॉकडाऊनमुळे या कारागिरांच्या हाताला काम राहिलं नाही.
परदेशात आदिवासी हस्तकलेला मोठी मागणी असली तरी सध्या आयात निर्यात बंद असल्याने या आदिवासी पेंटिंग करणाऱ्या कारागिरांना रोजगाराची गंभीर समस्या भेडसावत होती. यावर आदिवासी युवा सेवा संघाने शोधलेला हा पर्याय नक्कीच वाखाणण्याजोगं आहे
यातून या आदिवासी कलाकारांना रोजगार तर मिळतोच शिवाय आदिवासी पेंटिंग ही जिवंत राहण्यास मदत होते.
आदिवासी हस्त कलेला मोठी मागणी असली तरी सध्या ही हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी या आदिवासी युवा सेवा संघाने पुढाकार घेतला असून या तरुणांच्या हाताला रोजगार दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांना खीळ बसू लागली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम ग्रामीण भागात जाणवू लागला आहे. पालघरमधील आदिवासी भागात वारली पेंटिंग करणारे पेंटर ही याला अपवाद ठरले नाहीत. मात्र या सगळ्यातून रोजगार शोधण्याचं काम आदिवासी युवा सेवा संघाच्या माध्यमातून वारली हस्तकलेद्वारे सध्या सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -