US Election 2020 : राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेत कुठे उत्साह तर कुठे निराशा; बायडन समर्थकांची घोषणाबाजी
फिलाडेल्फिया, न्यूयॉर्क आणि अरिजोना या अमेरिकेतील महत्त्वाच्या शहरांमध्ये काही ठिकाणी ट्रंप समर्थक, तर काही ठिकाणी जो बायडन यांच्या समर्थकांची गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजो बायडन राष्ट्रपती पदाची निवडणुक जिंकल्याचं वृत्त सगळीकडे पसरताच अमेरिकेतील शहरांत रस्त्यांवर अनेक लोकांची गर्दी जमली होती.
अनेक लोकांनी ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. तर अनेक लोक त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.
डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी गॉल्फ खेळून व्हाइट हाऊसमध्ये परतत होते. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा त्यांचे समर्थक आणि विरोधी यांची गर्दी जमा झाली होती.
अमेरिकेतील वेगवेगळ्या भागांत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवगेळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. तर काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.
निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अमेरिकेतील परिस्थिती तणावपूर्ण होती. तसेच निकालांनतर हिंसा होऊ नये या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आली होती. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी पहिल्यांदा देशाच्या जनतेला संबोधित केलं. आपलं होम स्टेट असलेल्या डेलावेयरमध्ये एका मोठ्या जनसभेत बायडन यांनी जनतेला संबोधन केलं.
अमेरिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच अमेरिकेला एक महिला उपराष्ट्रपती मिळाल्या आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जिंकली आहे.
अनेक लोक जो बायडन यांच्या विजयामुळे भावूक झाले होते. सध्या आतापर्यंत अमेरिकेत शांतता आहे. त्यामुळे जो बायडन यांच्या विजयाचं अमेरिकेतील नागरिकांना स्वागत केलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -