Late पण थेट | युजवेंद्र- धनश्रीच्या हळदीचे फोटो व्हायरल
(Photo Credit : Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनश्रीबाबत सांगायचं झालं तर तिची स्वतःची डान्स अकॅडमी आहे. तसेच ती उत्तम कोरिओग्राफर आहे. अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Photo Credit : Instagram)
युजवेंद्र चहलला लॉकडाऊन दरम्यान, डान्स शिकायचा इच्छा होती. त्यासाठी त्याने धनश्रीचा ऑनलाईन डान्स क्लास जॉईन केला होता. इथेच त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही आपली लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता. (Photo Credit : Instagram)
धनश्री आणि युजवेंद्र दोघांचा विवाहसोहळा 22 डिसेंबर रोजी पार पडला होता. लॉकडाऊन दरम्यान दोघांनी साखरपुडा केला होता. दोघांच्याही प्रेम कहानीची सुरुवात लॉकडाऊन दरम्यान झाली होती. (Photo Credit : Instagram)
धनश्रीच्या ज्वेलरीकडे पाहाल तर तिने आपल्या हळदी समारंभासाठी फुलांचे दागिने परिधान केले होते. यामध्ये झुमके, मांग टीका, बांगड्या सगळी ज्वेलरी फुलांनी तयार केलेली होती. फोटोंमध्ये धनश्रीच्या चेहऱ्यावर हळद लावल्याचंही दिसत आहे. (Photo Credit : Instagram)
या फोटोंमध्ये धनश्री आणि युजवेंद्र दोघेही पिवळ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये दिसून आले. युजवेंद्रने पिवळ्या रंगाचा कुर्ता वेअर केला होता. तर धनश्रीने पिवळ्या रंगाचा लेहेंगा वेअर केला होता. ती या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. (Photo Credit : Instagram)
हळदीच्या फोटोंमध्ये धनश्री आणि युजवेंद्र दोघेही पिवळ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. युजवेंद्रने जिथे पिवळ्या रंगाचा कुर्ता वेअर केला होता, तर धनश्रीने पिवळ्या रंगाचा लेहेंगा वेअर केला होता. ती अत्यंत सुंदर दिसत होती. (Photo Credit : Instagram)
22 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी आपली लग्नगाठ बांधली होती. दोघांचे लग्नाचे फोटो त्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, इतर कोणत्याच लग्न समारंभाचे फोटो समोर आले नव्हते. अशातच आता या दोघांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -