PHOTO | आज तिसरा श्रावणी सोमवार, ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे प्रभू महादेवाला पुष्प शृंगार
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक सण-उत्सन रद्द करण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळे यावर्षी भाविकांना मंदिरात जाऊन मात्र दर्शन घेता येत नसल्याने भाविक कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.
आज श्रावणातील तिसरा श्रावणी सोमवार. यानिमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवं ज्योतिर्लिंग नागेश दारुकावणे येथे महादेवाला पुष्प शृंगार घालयण्यात आला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांना मंदिरात प्रेवश देण्यात येत नाही.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या श्रावणी सोमवारी देखील मंदिर परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
दरवर्षी श्रावणी सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी लाखो भाविक औंढा नागनाथ येथे गर्दी करत असतात.
देवस्थानचे अधिक्षक वैजनाथ पवार आणि पुजारी, पुरोहित यांनी महापूजा केली.
गेल्या सोमवार प्रमाणेच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विधिवत पूजा पार पडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -