Photo | सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार; शोकाकूल वातावरणात भावपूर्ण निरोप
सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून सुशांतने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुशांतने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं त्याच्या नोकराने पाहिलं होतं. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती. (Photo Credit: Manav Manglani)
सुशांत सिंह राजपूतने उचललेल्या या पावलामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सुशांतला अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली होती. (Photo Credit: Manav Manglani)
सुशांत सिंह गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनचा सामना करत होता. (Photo Credit: Manav Manglani)
सुशांतने गळफास घेतल्यामुळे त्याचा श्वास कोंडला आणि त्याचा मृत्यू झाला, अस रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. (Photo Credit: Manav Manglani)
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सुशांतने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. (Photo Credit: Manav Manglani)
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टमनंतर सोमवारी कूपर रूग्णालयाने रिपोर्ट जारी केला होता. (Photo Credit: Manav Manglani)
दरम्यान, सुशांत सिंह राजपूरने रविवारी आपल्या वांद्र्यातील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. (Photo Credit: Manav Manglani)
पाटणाहून त्याच्या कुटुंबिय मुंबईत पोहोचल्यानंतर सुशांतचं पार्थिव कूपर रुग्णालयातून विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं. (Photo Credit: Manav Manglani)
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील विले पार्लेमध्ये सुशांतच्या पार्शिवाला त्याच्या वडिलांनी मुखाग्नी देण्यात आला. सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे कुटुंबीय पाटणाहून मुंबईला आले होते. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -