Yuvraj Singh Birthday : डरबनचे मैदान, युवराजची बॅट अन् इंग्लंडची दाणादाण
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या विस्फोटक खेळीने युवराजने नेहमीच चाहत्यांच्या मनात घर केले आहे. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App. जून 2019 मध्ये युवराज सिंह यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 2007 मधील टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयात युवराजनं सिंहाचा वाटा उचलला होता. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)
युवराजची अष्टपैलू खेळी आणि त्याची खिलाडू वृत्ती क्रिकेटप्रेमींना भावते. त्यामुळेच भारता तर त्याचे चाहते आहेतच. परंतु, भारताबाहेरही त्याचे असंख्य चाहते आहेत. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)
युवराज सिंह सर्वात चर्चेत आला तो, 2007 ला झालेल्या आंतराष्ट्रीय टी-20 विश्वकप स्पर्धेपासून. स्पर्धेदरम्यान इंग्लंडविरोधात झालेल्या एका सामन्यात युवराजने सहा चेंडूवर जबरजस्त सहा षटकार खेचले. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)
युवराजे 12 चेंडूंमध्ये सर्वात जलत फिफ्टी करणारा खेळाडू म्हणून आपल्या नावे एक विक्रम केला.(Photo:@yuvirajsinghofficial/FB)
युवराजने 308 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 52 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे.(Photo:@yuvirajsinghofficial/FB)
भारत आणि इंग्लंडमध्ये 19 डिसेंबर रोजी ग्रृप E साठी खेळल्या गेलेल्या सामन्यात युवराजने ही जबरदस्त कामगिरी केली होती. 17 व्या षटकारानंतर 6 चेंडू आणि 14 धावांवर खेळणाऱ्या युवराजच्या 18 वे षटक संपताना 50 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि स्टुअर्ट ब्रॉण्ड शर्टने आपला घाम पुसत होता. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)
इंग्लंडविरोधातील सामन्यात युवराजे 12 चेंडूंमध्ये सर्वात जलत फिफ्टी करणारा खेळाडू म्हणून आपल्या नावे एक विक्रम केला. 362.5 च्या स्ट्राइक रेटने 14 चेंडूत 58 धावा करून युवराज बाद झाला. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)