Mohammed Shami: 2,2,W,W,W,W; अखेरच्या षटकात मोहम्मद शामीची घातक गोलंदाजी

टी-20 विश्वचषकातील पहिल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात या सराव सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताचा सलामीवीर केएल राहुल आणि तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावू 187 धावांचं लक्ष्य ठेवलं
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताच्या विजयात मोहम्मद शामीनं महत्वाची गोलंदाजी केली. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असताना मोहम्मद शामीनं घातक गोलंदाजी केली.
19.1: अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर पॅट कमिन्सनं मिड विकेटच्या दिशेनं फटका मारला. या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात दोन धावा जमा झाल्या.
19.2: दुसऱ्या चेंडूवरही पॅट कमिन्सनं मिड-ऑनच्या दिशेनं शॉट खेळूनं आणखी दोन धावा काढल्या.
19.3: तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्स झेलबाद झाला. पॅट कमिन्सला आऊट करण्यात विराट कोहलीचा मोलाचा वाटा आहे. त्यानं लॉन्ग ऑनच्या सीमारेषेजवळ अशक्य असा झेल पकडून भारताच्या विजयाचा पाया रचला.
19.4: चौथ्या चेंडूवर अॅस्टन अगर रनआऊट झाला.
19.5: पाचव्या चेंडूवर मोहम्मद शामीनं जोश इंग्लिशला क्लीन बोल्ड केलं.
19.6: अखेरच्या चेंडूवर मोहम्मद शामीनं उत्कृष्ट एक यॉर्कर टाकून केन रिचर्डसनला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत भारताला विजय मिळवून दिला.