Manish Narwal : हरियाणाच्या 19 वर्षीय मनीषनं रचला इतिहास, सुवर्णपदकावर निशाणा, होतेय कौतुक
हरियाणाच्या कथुरा गावातल्या या 19 वर्षीय युवा खेळाडूनं इतिहास रचला आहे. (Photo :PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनीषनं पहिल्या दोन शॉटमध्ये 17.8 स्कोर केला होता. मात्र त्यानंतर त्यानं शानदार वापसी केली. (Photo : Social media)
पाच शॉट नंतर मनीष नरवाल टॉप थ्रीमध्ये आला. पाच शॉटनंतर त्याचा स्कोर 45.4 होता तर 12 शॉट नंतर मनीषचा स्कोर 104.3 होता. (Photo : Social media)
सिंहराजनं याच प्रकारात रौप्यपदक मिळवून दिलं आहे. सिंहराज अधानानं याआधी कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं होतं. आता त्यानं रौप्यपदक जिंकून आपलं दुसरं पदक निश्चित केलं आहे.(Photo : Social media)
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी दोन पदकाची भर पडली आहे. भारताच्या खात्यात आता एकूण 15 पदकं झाली आहेत. (Photo : Social media)
याआधी भारताला अवनी लेखरानं 10 मीटर शूटिंगमध्ये तर सुमित अंतिलनं भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.(Photo : Social media)
भारतानं आतापर्यंत तीन सुवर्णपदक, सात रौप्यपदक आणि पाच कांस्यपदक जिंकली आहेत. (Photo : Media sai)