Mohammed Shami : मोहम्मद शमी टीम इंडियाचा 'अर्जुन' होणार? बीसीसीआयची अत्यंत शेवटच्या क्षणी मोठी चाल!
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने शमीच्या नावाचा समावेश करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाला विशेष विनंती केली आहे, कारण त्याचे नाव देशातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाच्या यादीत नव्हते.
शमीने यावर्षी भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली होती.
शमी पहिल्या 4 सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने कहर केला.
शमीने स्पर्धेत 7 सामने खेळले, ज्यात त्याने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या.
शमीने विश्वचषकात 5.26 च्या सरासरीने या विकेट घेतल्या. मात्र, भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
या तुफानी कामगिरीनंतर आता बीसीसीआयने हा निर्णय घेत शमीचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे.
भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
शमीने हा पुरस्कार मिळाल्यास आनंद असल्याचे म्हटले आहे.
शमी म्हणाला की, हा पुरस्कार मिळाला तर आनंदाची गोष्ट आहे. हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही.