Shubman Gill : चाचपडणारा गिल अखेर ‘यशस्वी’ मार्गावर; शुभमनच्या झुंजार शतकाने टीम इंडिया भक्कम स्थितीत!
गेल्या अनेक दिवसांपासून चाचपडत असलेल्या शुभमन गिलने अखेर आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुभमन बराच काळ कसोटीत संघर्ष करत होता.
मात्र विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शुभमनने शानदार फलंदाजी करत शतक केले.
कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना शुभमनचे पहिले शतक होते.
11 महिने आणि 12 डावांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गिलने शतक ठोकले आहे. त्याने 147 चेंडूत 104 धावा केल्या.
शुभमनने 70 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 11 चौकार आणि 2 षटकारही मारले.
सामना पाहण्यासाठी शुभमनचे वडिलही मैदानात उपस्थित होते.
गिलच्या खेळीचे टीम व्यवस्थापनाकडूनही जोरदार स्वागत करण्यात आले.
गिलच्या शतकाने टीम इंडियाला चारशेच्या घरात आघाडी घेण्यात मदत झाली.
गिल आणि अक्सर पटेल सोडून टीम इंडियाच्या कोणत्याच फलंदाजाला दुसऱ्या डावात चमकली नाही.