Sania Mirza Shoaib Malik Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा सुखी संसार मोडला, ही तिसरी व्यक्ती आहे कारण?
Shoaib Malik Sania Mirza Divorce : भारतीय टेनिसपटू ( Indian Tennis Player ) सानिया मिर्झा ( Sania Mirza ) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक ( Shoaib Malik ) यांचा घटस्फोट झाला आहे.

Shoaib Malik Sania Mirza Divorce
1/10
12 वर्षाच्या सुखी संसारानंतर आता हे दोघं विभक्त झाले आहेत. यांना चार वर्षाचा एक मुलगा आहे.
2/10
गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यातमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. शोएब मच्या जवळच्या एका व्यक्तीने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
3/10
पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएब मलिक सध्या दुसऱ्या एका तरुणीला डेट करत आहे. शोएबचं Extramarital Affair
4/10
काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती.
5/10
काही दिवसांपूवी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली होती. सानियाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती.
6/10
याशिवाय सानियाने तिचा मुलगा इजहानच्या वाढदिवसाला इजहानचा फोटो शेअर केला होता. पण शोएबचा नाही. तेव्हाचा या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं स्पष्ट झालं होतं.
7/10
या शिवाय सानियाने सोशल मीडियावर शोएबसोबतची शेवटची पोस्ट सुमारे एक वर्षापूर्वी शेअर केली होती.
8/10
दोघेही मागील बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. सानिया सध्या दुबईमध्ये तर शोएब पाकिस्तानमध्ये आहे.
9/10
2010 साली सानिया आणि शोएब यांनी ल्गन केलं होतं. 2018 साली त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव इजहान असून तो आता चार वर्षांचा आहे.
10/10
सानियाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, आता तिचा मुलगा इजहानचं तिला या संकट काळात लढण्याची ताकद देत आहे.
Published at : 10 Nov 2022 11:44 AM (IST)