In Pics : 100 कोटींच्या बंगल्यात राहतो सचिन तेंडुलकर', पाहा घराच्या आतील फोटो
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात अनेक मोठे विक्रम केले आहेत. सचिन तेंडुलकर हे केवळ क्रिकेटच्या खेळपट्टीवरच नाही तर कमाई आणि व्यवसायातही मोठे नाव आहे. मास्टर ब्लास्टरने त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा त्याच्या घरावर खर्च केला आहे. पुढील स्लाईड्समध्ये सचिन तेंडुलकरच घर आतून कसं दिसत, हे आपण पाहणार आहोत...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवांद्रे पश्चिम येथील पेरी क्रॉस रोडवर सचिन तेंडुलकरचे घर आहे. सचिन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह या बंगल्यात राहतो. हे घर 2007 मध्ये मास्टर ब्लास्टरने 39 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
सचिन तेंडुलकरचे हे घर 6000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. खरे तर हे घर 1926 मध्ये बांधण्यात आले होते. अशा स्थितीत सचिनच्या म्हणण्यानुसार या घराचे नूतनीकरण करण्यासाठी 4 वर्षे लागली आहेत. आताच्या बाजारभावानुसार, या घराची किंमत अंदाजित 100 कोटी इतकी आहे.
घरामध्ये अनेक मजले तसेच दोन तळघर आहेत. घरामध्येच एक बाग देखील आहे, जी जगभरातील वनस्पतींनी सजलेली आहे.
सचिन तेंडुलकर आणि त्याचे संपूर्ण कुटुंब वास्तविक जीवनात खूप धार्मिक आहे. अशा परिस्थितीत सचिनने आपल्या घराचा मोठा भाग देव आणि मंदिराला समर्पित केला आहे. सचिन तेंडुलकरच्या घरातील मंदिर खरोखरच भव्य आहे.
लॉकडाऊनमध्ये मास्टर ब्लास्टने हा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या बाथरूमचे फोटो दिसत आहे.
यासोबतच सचिन आणि अंजलीला पेंटिंग्जची खूप आवड आहे. अशातच त्यांच्या घराच्या भिंतींवर अनेक वेगवेगळी चित्रे पाहायला मिळतात.
ही बाग देखील घराच्या सर्वात खास भागांपैकी एक आहे. येथे सचिन प्रत्येक सीझन एन्जॉय करताना दिसतो.
सचिन आणि अंजलीला मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन अशी दोन मुले आहेत.
सर्व फोटो सोशल मीडियावरून घेण्यात आली आहेत.