IPL 2022 : महेंद्रसिंह धोनी का घालतो 'नंबर 7'ची जर्सी? धोनीनं स्वतः दिलं या प्रश्नाचं उत्तर
IPL 2022 : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल (MS Dhoni) आयपीएलच्या मैदानातही धमाकेदार खेळी करताना दिसून येतो. (photo:mahi7781/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलमध्ये (IPL) धोनीच्या खांद्यावर चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची कर्णधार पदाची धुरा आहे. ही जबाबदारीही धोनी यशस्वीरित्या पार पाडताना दिसतो. (photo:mahi7781/ig)
पण सध्या चर्चा रंगली आहे ती, धोनीच्या जर्सीवरील 'नंबर 7'ची. अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे, महेंद्रसिंह धोनी नंबर 7ची जर्सी का घालतो? याचं उत्तर स्वतः धोनीनं दिलं आहे. (photo:mahi7781/ig)
चेन्नई सुपर किंग्स (CSK)चा कर्णधार एमएस धोनीनं खुलासा केला आहे की, 'नंबर 7' त्याच्या फार जवळचा आहे. कारण त्याचा जन्म 7 जुलै रोजी झाला होता. त्यामुळेच त्याच्या जर्सीचा नंबर 7 आहे. हा नंबर त्यानं कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडून निवडलेला नाही. (photo:mahi7781/ig)
धोनीनं जेव्हापासून क्रिकेटमध्ये आपला आंतरराष्ट्रीय डेब्यु केला आहे, तेव्हापासूनच त्याच्या जर्सीचा नंबर 7 आहे. धोनीमुळेच 'नंबर 7' हा अनेक चाहत्यांचा आवडता नंबर झाला आहे. (photo:mahi7781/ig)
इंडिया सिमेंट्स, चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांचा मूळ गटाद्वारे आयोजित एका कार्यक्रमात चाहत्यांशी बोलताना धोनीनं अनेक गोष्टींबाबत माहिती दिली. यावेळी भारताचा माजी कर्णधार धोनीनं नंर 7 का निवडला त्याचंही स्पष्ट कारण सांगितलं. धोनी म्हणाला की, अनेक लोकांनी सुरुवातीला विचार केला होता की, 'नंबर 7' माझ्यासाठी एक भाग्यशाली अंक आहे. खरं तर यामागील कारण म्हणजे, माझा वाढदिवस 7 जुलैला असतो. सातव्या महिन्यातला सातवा दिवस हे माझ्यासाठी आवडता नंबर आहे. त्यामुळे मी माझ्या जर्सीवर लिहिण्यासाठी माझ्या जन्मतारखेची निवड केली. (photo:mahi7781/ig)