Happy Birthday Saina | बॅडमिंटन कोर्टवर राज्य करणारी 'फुलराणी' सायना नेहवालचा आज वाढदिवस
बॅडमिंटनमध्ये भारताची एकमेव ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिचा आज वाढदिवस आहे. सायना आज 31 वर्षांची झाली आहे. सायनाचा जन्म 1990 साली हरियाणाच्या हिसार येथे झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॅडमिंटनच्या खेळात सायनाने मोठं यश संपादित केलं. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची खेळाडू म्हणून पदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
सध्या सायना नेहवालवर बायोपिक बनवली जात आहे. ज्यात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. सायना नेहवालच्या बायोपिकला 'सायना' असे नाव देण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विशेष निमित्ताने या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला आहे. 'सायना' हा चित्रपट 26 मार्च रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सायनाला राजीव गांधी खेलरत्न पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सायनाने बॅडमिंटन कोर्टात 24 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.
2012 मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून सायना नेहवालने सर्वांना चकित केले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय शटलर ठरली.
अनेक वेळा सायनाने देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. देशात आणि परदेशात खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यात तिने सुवर्ण व रौप्यपदके जिंकून देशाचे नाव मोठं केलं.
सायना नेहवालने कॉमनवेल्थ युथ टायटल तसेच कॉमनवेल्थ सिंगल गोल्ड, सुपर सीरिज टायटल, वर्ल्ड ज्युनियरचं टायटल जिंकलं आहे. या व्यतिरिक्त सायनाने 16 व्या वर्षी 2006 मध्ये राष्ट्रीय अंडर -19 स्पर्धाही जिंकली.