Vaibhav Suryavanshi : तोडफोड फलंदाजीनंतरही टीम इंडियाकडून नाही खेळणार वैभव सूर्यवंशी! आयसीसीच्या 'या' नियमाने घातला खोडा
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये आपल्या दमदार कामगिरीने संपूर्ण क्रिकेट विश्वात आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे.
Vaibhav Suryavanshi Team India News
1/10
वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये आपल्या दमदार कामगिरीने संपूर्ण क्रिकेट विश्वात आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे.
2/10
तो फक्त 14 वर्षांचा आहे, पण अलिकडेच तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
3/10
गुजरात संघाविरुद्ध त्याने 35 चेंडूत ही कामगिरी केली. या दमदार खेळीनंतर चाहत्यांना असे वाटते की वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो.
4/10
अनेक क्रिकेट दिग्गजांचेही असेच मत आहे.
5/10
पण आयसीसीच्या एका नियमामुळे सध्या त्याला टीम इंडियाकडून खेळणे कठीण वाटत आहे.
6/10
खरंतर, आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी अनेक नियम बनवले आहेत, त्यापैकी एक वयाशी संबंधित आहे.
7/10
ज्यामुळे वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी वाट पहावी लागू शकते.
8/10
तुम्हाला सांगतो की, 2020 मध्ये आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी किमान वयोमर्यादा धोरण बनवले होते.
9/10
या धोरणानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही खेळाडूचे वय किमान 15 वर्षे असणे आवश्यक आहे.
10/10
दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी सध्या फक्त 14 वर्षांचा आहे. पुढच्या वर्षी 27 मार्च रोजी तो 15 वर्षांचा होईल.
Published at : 29 Apr 2025 10:46 PM (IST)