Virat Kohli : विराट कोहली एक काम केल्यास कमबॅक करेल,आकाश चोप्रानं मार्ग सांगितला, म्हणाला...
वनडे वर्ल्ड कप 2023 आणि 2024 चं आयपीएल गाजवणाऱ्या विराट कोहलीला टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर गवसलेला नाही. विराट कोहली फॉर्ममध्ये कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहलीनं आतापर्यं तीन मॅचमध्ये पाच धावा केल्या आहेत. विराट कोहली सुपर 8 च्या लढतींमध्ये फॉर्ममध्ये परतेल, असा विश्वास माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त कला आहे.
आकाश चोप्रानं जिओ सिनेमावर आकाशवाणी कार्यक्रमात विराट कोहलीच्या कामगिरीवर भाष्य केलं. आकाश चोप्रा म्हणाला की विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्ध कमबॅक करेल.
विराट कोहली पहिल्या तीन मॅचमध्ये आक्रमकपणे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत होता. अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 8 मध्ये खेळताना बॉल चांगल्या प्रकारे बॅटवर येईल. वेस्ट इंडिजमधील बाऊंड्री देखील मोठ्या नाहीत, त्यामुळं विराट कमबॅक करु, शकतो, असं आकाश चोप्रा म्हणाला.
विराट कोहलनं स्वत: ला वेळ दिला पाहिजे. बांगलादेशचे गोलंदाज फजलहक फारुकी आणि नवीन उल हक चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अफगाणिस्तानकडे चांगले फिरकीपटू आहेत. विराटनं स्वत :ला वेळ दिल्यास फॉर्मची चिंता राहणार नाही, असं आकाश चोप्रा म्हणाला.