Umran Malik : हैदराबादचा उम्रान मलिक चमकला, गुजरातविरुद्धच्या कामगिरीने सर्वांनाच केले चकीत
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचा संघ पराभूत झाला असला तरी युवा गोलंदाज उम्रानने सर्वांनाच चकीत करुन सोडलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउम्रानने सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे त्याने सर्व महत्त्वाचे विकेट्स घेतले. ज्याच गुजरातचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांचा समावेश आहे.
कोणत्याही अनकॅप्ड गोलंदाजाचं आयपीएलमधील हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.
क्रिकेट सामन्यानंतर जिंकणाऱ्या संघातील खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ज्यालाच आयपीएलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच असंही म्हटलं जातं, ते अवार्ड दिलं जातं. पण उम्रानच्या अफलातून कामगिरीमुळे हैदराबाद पराभूत होऊनही उम्रानला हा पुरस्कार मिळाला.
उम्रानने या यशानंतर या यशामागील कारण सांगताना डेलने दिलेला गुरुमंत्र सांगितलं. डेल स्टेनने त्याला, 'लाईन-लेंथवर लक्ष नको देऊ, फक्त जमेल तितक्या वेगात टाक', असा सल्ला दिला होता.
उम्रान सध्या सोशल मीडियावर चांगलाच चमकत आहे.
उम्रानच्या या दमदार कामगिरीनंतर सर्व क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनीही तो लवकरच भारतीय संघात जाग मिळवेल असं म्हटलं आहे.
तर रवी शास्त्री आणि केविन पीटरसन यांनीही उम्रानला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळावी असं वक्तव्य केलं आहे.
त्यामुळे उम्रानची एक नेट बोलर म्हणून सुरु झालेली कारकिर्द आता तुफान वेगात आहे.