IPL 2023 : लखनौचा निकोलस पूरन ठरला विजयाचा 'हिरो'; रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूत विजय
Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर किंग्स (LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीला (LSG vs RCB) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखनौने शेवटच्या चेंडूवर हा रोमांचक सामना जिंकला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा थरारक सामना पार पडला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघमध्ये गडगडला पण शेवटी लखनौने आरसीबीवर एक गडी राखून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
लखनौ संघाने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बंगळुरूचा अवघा एक गडी राखून पराभव केला. अटीतटीच्या या सामन्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.
या सामन्यात लखनौच्या निकोलस पुरननं नवा विक्रम केला. निकोलस पुरनने आयपीएल (IPL 2023) मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं.
त्याने 15 चेंडूत 50 धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूत आरसीबीच्या तोंडातील सामना लखनौच्या झोळीत टाकला. 19 चेंडूत 62 धावांची खेळी करणारा निकोलस पूरनला सामनावीर म्हणजे 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने कर्णधार फाफच्या नेतृत्वाखाली 212 धावांचा डोंगर रचला.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 2 गडी गमावून 212 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने आरसीबी संघाला वेगवान सुरुवात करून दिली, पण तो अमित मिश्राचा बळी ठरला.
कोहलीने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या.