MI vs LSG Match HighLights : मुंबईकडून लखनौचं आव्हान संपुष्टात, 'पलटन'चा 'जायंट्स'वर 81 धावांनी दणदणीत विजय
यासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवलं आहे. आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 182 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनौ संघाला फक्त 101 धावांपर्यंतच मजल मारता आली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 182 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनौ संघाला फक्त 101 धावांपर्यंतच मजल मारता आली.
आकाश मधवालच्या (Akash Madhwal) भेदक माऱ्यापुढे लखनौच्या संघाची दाणादाण उडाली. मुंबई इंडियन्स दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारद झाला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने आठ गडी गमावून मोबदल्यात 182 धावा केल्या. मुंबईकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक 41 धावा केल्या.
त्यानंतर, रोहित शर्मा 11 धावांवर, सूर्यकुमार यादवला 33 धावांवर आणि कॅमेरॉन ग्रीनला 33 धावांवर आणि तिलक वर्मा 26 धावा करून बाद झाले.
सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्या खेळींमुळे मुंबईची धावसंख्या 182 धावांपर्यंत नेली.
लखनौकडून मार्कस स्टॉयनिस याने एकाकी झुंज दिली. मार्कस स्टॉयनिस याने 40 धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवाल याने पाच फलंदाजांना तंबूत धाडले.
लखनौकडून मार्कस स्टॉयनिस याने एकाकी झुंज दिली. मार्कस स्टॉयनिस याने 40 धावांची खेळी केली.
लखनौचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या विजयासह मुंबईने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे.
26 मे 2023 रोजी मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सामना होणार आहे. गुजरात आणि मुंबई यांच्यातील विजेता संघ 28 मे रोजी चेन्नईसोबत भिडणार आहे.