Mayank Yadav Latest Marthi News: मयंक यादवच्या गोलंदाजीवर प्रशिक्षक खूश; पाकिस्तानच्या संघालाही याआधी दिली आहे ट्रेनिंग
लखनौ संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक यादवने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित केले. (Image Source: IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमयंक यादनवे आपल्या पदापर्णाच्या सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकत ( fastest ball of IPL 2024 ) साऱ्यांना अवाक् केले. त्याशिवाय पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला. (Image Source: IPL)
मयंकने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात जलद (155.8 प्रति ताशी वेग) चेंडू टाकला. मयंकने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 156, 150, 142, 144, 153 आणि 149 च्या प्रति ताशी वेगाने गोलंदाजी केली.(Image Source: IPL)
मयंकने पंजाब किंग्सचे फलंदाज जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्माला बाद केले. मयंकच्या या कामगिरीनंतर त्याची कारकीर्द आणि प्रशिक्षकाबद्दल सध्या चर्चा केली जात आहे. (Image Source: IPL)
लखनौ संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज मॉर्ने मॉर्केल आहे. मयंकच्या या कामगिरीवर मॉर्केल देखील खूप आनंदी आहे.(Image Source:social media)
याआधी मॉर्ने मॉर्केलने पाकिस्तान क्रिकेट संघाला प्रशिक्षण दिले आहे. सध्या मॉर्केल लखनौचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. तसेच, मॉर्ने मॉर्केलने आपल्या पत्नीसाठी आपला देश सोडला होता.(Image Source:social media)
दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल पत्नीसाठी ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. यापूर्वी मॉर्ने मॉर्केलने जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. (Image Source:social media)
मयंकची कामगिरी - मयंकची एकूण कामगिरी चांगली झाली आहे. त्याने 11 टी-20 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. या काळात एका सामन्यात 20 धावांत 3 बळी घेणे ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मयंकने 17 लिस्ट ए मॅचमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत. त्याने एक प्रथम श्रेणी सामनाही खेळला आहे. यामध्ये 2 बळी घेतले. मयंकने लिस्ट ए मॅचमध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध 3 विकेट घेतल्या होत्या. नोव्हेंबर 2023 मध्ये अहमदाबादमध्ये हा सामना झाला होता.(Image Source: IPL)