IPL 2025 Mega Auction : RCB मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर खेळणार डाव.... विराट कोहली पहिल्यांदा जिंकणार IPL ट्रॉफी?
IPL 2025 Mega Auction RCB : यावेळी आयपीएलच्या नवीन हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावात नवीन खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी हंगामासाठी सर्व फ्रँचायझी आपापल्या संघात चांगल्या युवा खेळाडूंचा समावेश करण्याकडे लक्ष देतील.
अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचीही नजर तीन अनकॅप्ड खेळाडूंवर राहणार आहे. मात्र, या तीनपैकी दोन खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपली छाप सोडली आहे. अशा परिस्थितीत, यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मेगा लिलावात या खेळाडूंना टार्गेट करू शकतात. जेणेकरून ते या हंगामात तरी ट्रॉफी जिंकतील.
टीम इंडियाचा स्टार डॅशिंग खेळाडू सरफराज खानचा भाऊ मुशीर खानच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात मुशीरने अप्रतिम शतक झळकावले होते. मात्र, या सामन्यात मुशीरचे द्विशतक हुकले. याआधी मुशीरने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये अनेक शतके झळकावली होती, त्यामुळे आता मेगा लिलावात आरसीबी मुशीरला टार्गेट करू शकते.
शशांक सिंग पंजाब किंग्जकडून शेवटचा आयपीएल हंगाम खेळला आहे. शशांकने पंजाबसाठी अप्रतिम कामगिरी केली होती. आयपीएल 2024 त्याच्यासाठी खूप छान होते. गेल्या हंगामात शशांकने 14 सामने खेळले, ज्यात त्याने फलंदाजी करताना 354 धावा केल्या होत्या. जर पंजाबने मेगा लिलावापूर्वी शशांकला सोडले तर आरसीबी या खेळाडूला खरेदी करू शकते.
नितीश कुमार रेड्डी यांच्यासाठी आयपीएल 2024 खूप चांगले होते. नितीश कुमार रेड्डी यांनी सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली होती. नितीश कुमार रेड्डी यांनी आयपीएल 2024 मध्ये 15 सामने खेळले, ज्यात त्यांनी फलंदाजी करताना 303 धावा केल्या. याशिवाय नितीशने गोलंदाजी करताना 3 बळीही घेतले. आता या खेळाडूवरही आरसीबीची नजर असेल.