IPL 2024: गौतम गंभीरने वडिलांच्या मित्राच्या मुलीशी केले लग्न; पण लग्नाआधी पत्नीसमोर ठेवली होती एक अट
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर IPL 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघातील मेंटॉरची भूमिका बजावत होता. प्रदीर्घ कालावधीनंतर गौतम गंभीर मेंटॉरच्या भूमिकेत परतला आणि केकेआरला जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्वाची भूमिका निभावली. (image credit-social media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगंभीरला मैदानात क्रिकेटर आणि मेंटॉर म्हणून जवळपास सगळेच ओळखतात, पण मैदानाबाहेर त्याला फार कमी लोक ओळखतात. गंभीरची प्रेमकहाणी देखील खूप मनोरंजक आहे.(image credit-social media)
गंभीरच्या पत्नीचे नाव नताशा असून ती त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनूसार, गंभीर आणि नताशा यांची पहिली भेट 2007 मध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. (image credit-social media)
काही वर्षांनंतर दोघांच्या कुटुंबीयांनी गौतम गंभीर आणि नताशाच्या लग्नाबाबत विचार सुरु केला. (image credit-social media)
लग्नाच्या गोष्टी सुरु असताना गंभीरने लग्नाआधी नताशासमोर एक अट ठेवली होती. (image credit-social media)
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतरच आपण लग्न करणार असल्याची अट गंभीरने नताशासमोर ठेवली. त्यानंतर विश्वचषकानंतर 2011 मध्ये गंभीर आणि नताशाने लग्न केले.(image credit-social media)
गंभीर आणि नताशाला दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव आजीन आणि लहान मुलीचे नाव अनैजा आहे.(image credit-social media)
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द- गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 वनडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये 4154 धावा केल्या आहेत. (image credit-social media)
कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिलाय. (image credit-social media)