Suyash Sharma in IPL : अवघा 19 वर्षीय खेळाडू पडला RCB वर भारी, 20 लाखांच्या खेळाडूचं KKR च्या विजयात मोठं योगदान; कोण आहे सुयश शर्मा?
आयपीएलच्या (IPL 2023) नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 81 धावांनी दारुण पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात फिरकीपटूंचा जलवा पाहायला मिळाला. कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांच्या पुढे आरसीबीला (RCB) मोठा खेळ करता आला नाही. केकेआरसाठी पदार्पण करणाऱ्या एका नव्या मिस्ट्री स्पिनरने पदार्पणाच्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी करून सर्वांना चकित केलं आहे.
आरसीबीविरुद्ध 20 लाख रुपयांना विकत घेतलेल्या खेळाडूची जादू पाहायला मिळाली. केकेआरच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका कशी बजावली.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात एक नवखा खेळाडू सुयश शर्मा याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली.
केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने सुयश शर्माचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात समावेश केला. कोलकाताकडून पदार्पण करणाऱ्या सुयश शर्माचा हा 'ड्रीम डेब्यू' ठरला.
सुयशने 4 षटकात 30 धावा देत 3 बळी घेतले. सुयश शर्माने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दिनेश कार्तिकला 9 आणि अनुज रावतला अवघ्या एक धावांवर तंबूत परत पाठवला आणि सर्वांनाच चकित केलं.
त्यानं 13व्या षटकात दोन्ही फलंदाजांना बाद केलं. त्यानं कर्ण शर्माला एका धावेवर बाद करत तिसरी विकेट घेतली.
19 वर्षीय सुयश शर्माचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. या सामन्यात त्याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून एंट्री घेतली आणि पहिल्याच सामन्यात 3 विकेट घेत आरसीबीला विजयापासून दूर नेलं.
सुयशने 4 षटकात 7.50 शून्याच्या इकॉनॉमी रेटने 30 धावांत 3 बळी घेतले. या युवा मिस्ट्री स्पिनरने पदार्पणाच्याच सामन्यात दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्मा यांना बाद करून तीन बळी घेतले.