IPL 2022 Auction मध्ये 'या' 8 भारतीय फलंदाजांवर सर्वांची नजर
मागील वर्षीपर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा शिखर धवनला यंदा दिल्लीने रिटेन केलेलं नाही. त्यामुळे शिखरसारखा अनुभवी डावखुरा फलंदाज घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिखरनंतर आणखी एक डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशनवर अनेकांच्या नजरा असणार आहेत. पण मुंबई इंडियन्सच त्याला पुन्हा संघात घेईल अशी दाट शक्यता आहे.
आणखी एक डावखुरा सलामीवीर देवदत पडीकलला यंदा आरसीबीने रिटेन केलं नसल्याने त्याला घेण्यासाठीही मोठी बोली लागू शकते.
कर्णधारपदाचा दावेदार असणारा श्रेयस अय्यरला यंदा कोणता संघ घेईल? आणि त्याला कर्णधारपद मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लिलावातूनच समोर येईल.
पंजाब संघाकडून आयपीएल 2021 मध्ये सामन्यांमध्ये काही हटके खेळी करणाऱ्या शाहरुख खानलाही आगामी आयपीएलमध्ये घेण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतील
केकेआरचा एक विश्वासू फलंदाज राहुल त्रिपाठीला केकेआरने रिटेन न केल्यामुळे त्याला घेण्याकरता मोठी बोली लागू शकते. पण केकेआर त्याला पुन्हा घेण्याची दाट शक्यता आहे.
केकेआरचा आणखी एक फलंदाज जो गरज पडल्यास गोलंदाजीही करु शकतो, अशा नितीश राणावर या हंगामात मोठी बोली लागू शकते.
या यादीत शेवटचं नाव म्हणजे अनुभवी भारतीय फलंदाज रॉबीन उथप्पा. 2007 विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील रॉबीन मागील आयपीएल चेन्नईकडून खेळला होता. त्याला यंदाच्या आयपीएलमध्येही घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील.