IPL 2022: ऋतुराज गायकवाड ते शाहरुख खान, या युवांच्या कामगिरीकडे असेल लक्ष
Ruturaj_Gaikwad
1/8
युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आयपीएलच्या 2021 सत्रात दमदार प्रदर्शन केलं होतं. 16 सामन्यात 635 धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळेच चेन्नई संघाने ऋतुराजला रिटेन केलं आहे. यंदाही ऋतुराजच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.
2/8
ईशान किशनने (Ishan Kishan) मुंबईकडून खेळताना अनेकदा तुफानी फलंदाजी केली आहे. गेल्या हंगामात 10 सामन्यात 241 धावा चोपल्या होत्या. या लिलावात ईशान किशनवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. तसेच ईशानच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
3/8
पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) दिल्ली संघाने रिटेन केलं आहे. गेल्या हंगमात पृथ्वीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता. यदाही पृथ्वी कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचे लक्ष असेल.
4/8
आयपीएलच्या 2021 मध्ये युवा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) सर्वांनाच प्रभावित केलं होतं. दहा सामन्यात वेंकटेशने 370 धावा काढल्या होत्या. 2022 च्या हंगामातही वेंकटेशच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
5/8
युवा फलंदाज देवदत्त पडिकलने (Devdutt Padikkal) गेल्या हंगामात आरसीबीकडून खेळताना 14 सामन्यात 411 धावा चोपल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या लिलावत पडिकलवर मोठी बोली लागण्याची शक्यताही आहे. तर 2022 च्या हंगामातही पडिकलने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने लक्ष वेधू शकतो.
6/8
रियान परागचा (Riyan Parag) मागील हंगाम तितकासा चांगला गेला नव्हता. पण या प्रतिभावंत खेळाडूच्या कामगिरीवर क्रीडा चाहत्यांची नजर असेल.
7/8
अब्दुल समद (Abdul Samad) .
8/8
शाहरुख खान (Shahrukh Khan)
Published at : 24 Jan 2022 11:58 PM (IST)