IPL 2022: पांड्या बंधू आता वेगवेगळ्या फ्रेंचायझीसाठी खेळणार!
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) वेगवेगळ्या संघासाठी खेळणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे दोघेही याआधी मुंबई इंडीयन्सच्या संघासाठी खेळत होते. परंतु, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये हार्दिकला गुररात टायटन्स तर, कृणाल पांड्याला लखनौ सुपर जॉईंट्स संघानं खरेदी केलंय.
यंदाच्या हंगामात दोघेही एकमेकांच्याविरोधात खेळणार आहेत. यातच कृणालची पत्नी पंखरी शर्मानं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केलीय. ही पोस्ट पोहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलंय.
आयपीएलच्या मागच्या हंगामात हार्दिक आणि कृणाल हे दोघेही एकाच संघासाठी म्हणजेच मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळत होते. परंतु, आयपीएल 2022 मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईच्या संघानं दोघांना रिलीज केलं.
आयपीएलमधील नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्सनं हार्दिक पांड्याला 15 कोटीत खरेदी केलं. तर, लखनौच्या संघानं कृणाल पांड्याला 8.25 कोटीत विकत घेतलंय. यामुळं यंदाच्या हंगामात दोघेही एकमेकांच्याविरोधात खेळणार आहेत.