Akash Madhwal : आकाश मधवालची कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी, लखनौविरोधातील सामन्यात भेदक मारा, घातक गोलंदाजीनं घेतल्या 5 विकेट
मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू आकाश मधवालच्या (Akash Madhwal) गोलंदाजीने सर्वांना चकित केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल 2023 मध्ये एलिमिनेटर सामन्यात (IPL 2023 Eliminator) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Gaints) 81 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
या सामन्याचा खरा हिरो आकाश मधवाल ठरला. आकाश मधवालने लखनौच्या फलंदाजांची पुरती नाचक्की केली. आकाशने पाच विकेट घेत या सामन्यात विक्रमी कामगिरी केली आहे. या खेळीसह त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
आयपीएलमध्ये एका सामन्यात पाच विकेट घेत त्याने अनिल कुंबळेच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात किफायतशीर पाच बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
आकाशने 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. ही यंदाच्या आयपीएलमधील गोलंदाजांपैकी सर्वात चांगली खेळी आहे.
याआधी कुंबळेने 2009 मध्ये 3.1 षटकात 5 धावा देऊन 5 बळी घेतले होते. मधवालने 3.3 षटकांत ही कामगिरी केली आहे.
मुंबई इंडियन्सला आकाश मधवालच्या रूपाने एक नवा स्टार मिळाला आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात 5 विकेट घेत अनेक विक्रम मोडले.
आकाश मधवालने या मोसमात गेल्या तीन-चार सामन्यांमध्ये धोकादायक गोलंदाजी केली आहे. या सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध तीन, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार आणि आता 5 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची इकोनॉमीही उत्कृष्ट आहे.
मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवालला यंदाच्या हंगामात सुरुवातीला खेळण्याची संधी मिळाली नाही.
मात्र अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीच यश न मिळाल्याने आकाशला संधी देण्यात आली. या संधीचं सोनं केलं.
अवघ्या काही सामन्यांमध्ये आकाश या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे.