अजिंक्यचा रूद्रावतार! यंदाच्या IPL मधील वेगवान अर्धशतक, लॉर्डचा विक्रम मोडला
मुंबईकर अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या मैदानावर झंझावाती फलंदाजी केली. अजिंक्यने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढली. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच अजिंक्यने दमदार कामगिरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईने दिलेल्या 158 धावांच्या माफक आव्हानाच पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. डेवॉन कॉनवे गोल्डन डक झाला.. त्यामुळे पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने सामन्याचे चित्र बदलले. अजिंक्य याने वानखेडे मैदानावर चोहोबाजूने फटकेबाजी केली.
अजिंक्यने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने 3 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पडाला. अजिंक्य फलंदाजी करताना भन्नाट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडही बघ्याच्या भूमिकेत होता.
अजिंक्य रहाणेने आजच्या सामन्यात 27 चेंडूत 61 धावांची खेळी केली. ऋतुराजसोबत त्याने 82 धावांची भागिदारी केली, यामध्ये अजिंक्य रहाणेचा वाटा 61 धावांचा होता.
अजिंक्य रहाणेने एका षटकात तब्बल 23 धावा वसूल केल्या, त्यावरुन त्याच्या विस्फोटक फलंदाजीचा अंदाज लावू शकता.
अजिंक्य रहाणे याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. याआधी हा विक्रम शार्दुल ठाकूरच्या नावावर होता. शार्दुल ठाकूरने आरसीबीविरोधात 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. रहाणेने हा विक्रम मोडीत काढत अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले.