IPL 2021 Captains PHOTO : आयपीएलच्या सर्व संघांच्या कर्णधारांची घोषणा, यंदा दोन संघांना नवे शिलेदार..
IPL 2021 Captains List: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. यापूर्वी, आयपीएलच्या आठ संघांचे कर्णधार कोण आहेत आणि कोणत्या कर्णधाराला आयपीएलचा किती अनुभव आहे हे जाणून घ्यायला हवं. त्यामुळे क्रिकेट फॅन म्हणून कोणत्या कर्णधाराने किती सामने जिंकलेत त्याची कर्णधार म्हणून कारकिर्द कशी राहिली आहे, याचा अंदाज बांधता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमएस धोनी नेहमीप्रमाणे चेन्नई सुपर किंग्ज अर्थात सीएसकेचा कर्णधार असणार आहे.आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीने 177 सामन्यात संघांचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी धोनीने 105 सामने जिंकले आहेत, तर 71 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करेल.रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणावा लागेल. तिसर्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने 106 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 61 सामने संघाने जिंकले आहेत, तर 43 सामने संघाने गमावले आहेत. दोन सामने टाय झाले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजेच आरसीबी पुन्हा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळेल. विराट कोहलीने आरसीबीकडून 112 सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. त्यापैकी 50 सामन्यात विजय मिळवला तर 56 सामन्यात संघाचा पराभव झाला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने आपला जुना कर्णधार इयॉन मॉर्गनवर पुन्हा विश्वास दाखवला आहे, मॉर्गनने 2020 च्या अर्ध्या मोसमानंतर संघाचं कर्णधारपद स्वीकारलं होतं.
सनरायझर्स हैदराबाद पुन्हा डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात खेळेल.सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरकडे 63 सामन्यामध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्यापैकी 34 सामने संघाने जिंकले आहेत आणि 28 सामने गमावले आहेत.
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल असेल. मागीलल हंगामातही केएल राहुलने पंजाबचं नेतृत्व केलं होतं.केएल राहुलने पंजाबचं नेतृत्व करताना 14 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि सात सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना टाय देखील झाला आहे.
राजस्थान रॉयल्सने या मोसमात संजू सॅमसनला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने संघांचं नेतृत्व केलं होतं. मात्र यावर्षी त्याला संघाने रिलीज केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सने युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. ऋषभ आयपीएलमध्ये पहिल्यांदा कर्णधार म्हणून दिसणार आहे.