PHOTO : राजकारणाच्या मैदानात उतरलेले खेळाडू!
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह लवकरच आपली राजकीय इनिंग सुरु करणार आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम आदमी पार्टी पक्षाच्या वतीने हरभजन सिंह यांना राज्यसभेवर पाठवू शकते. यासोबतच त्याला जालंधर इथल्या नवीन क्रीडा विद्यापीठाचा कार्यभारही दिला जाऊ शकतो. हरभजन सिंह राजकारणात प्रवेश करणारा पहिला खेळाडू नाही. याआधीही अनेक भारतीय क्रिकेटपटू, फुटबॉलपटू आणि विविध क्षेत्रातील खेळाडूंनी राजकारणात प्रवेश केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवज्योत सिंह सिद्धू : भारतासाठी 51 कसोटी आणि 136 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या नवज्योत सिंह सिद्धू यांनी 2004 साली भारतीय जनता पक्षासोबत आपली राजकीय इनिंग सुरु केली. त्यानंतर पंजाब निवडणुकीपूर्वी 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जुलै 2021 ते मार्च 2022 पर्यंत ते काँग्रेस पक्षाच्या पंजाबचे प्रदेशाध्यक्षही होते. सिद्धूने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 7615 धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर 15 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
मोहम्मद अझरुद्दीन : दीर्घकाळ भारतीय संघाचे कर्णधार राहिलेल्या मोहम्मद अझरुद्दीनने 2009 मध्ये राजकीय इनिंगला सुरुवात केली होती. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी होऊन खासदार झाले. पाच वर्षांनंतर त्यांनी राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातून आपली ताकद दाखवली, पण 2014 च्या मोदी लाटेत त्यांचाही पराभव झाला. सध्या ते तेलंगणा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत.
गौतम गंभीर : टीम इंडियासाठी 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपक्षासोबत आपली राजकीय खेळी सुरु केली. त्याने भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. गौतम गंभीर अनेकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धोरणांवर हल्लाबोल करत असतो. 2020 च्या दिल्ली निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या दावेदारांपैकी एक होता.
याशिवाय चेतन शर्मा, चेतन चौहान, मोहम्मद कैफ, दिलीप तिर्की, कीर्ती आझाद, चेतन शर्मा, लक्ष्मीरतन शुक्ला, संदीप सिंग, योगेश्वर दत्त, बबिता फोगट, अस्लम शेर खान या खेळाडूंनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. यातील काही खेळाडू यशस्वी तर काही अयशस्वी ठरले आहेत. क्रिकेटपटूपासून राजकारणी झालेले, पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत.
मनोज तिवारी : पश्चिम बंगालचा फलंदाज मनोज तिवारीने गेल्या वर्षी झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या वतीने शिवपूर विधानसभेतून निवडणूक लढवली आणि तो जिंकला. त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मनोज अलीकडेच रणजी करंडक खेळण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाला होता. मनोज तिवारीने टीम इंडियासाठी 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत.
राज्यवर्धन सिंह राठोर: नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोड, ज्यांनी 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले, त्यांनी भारतीय सैन्यातून निवृत्ती घेऊन सप्टेंबर 2013 मध्ये राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश केला. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांना 2017 मध्ये क्रीडा आणि युवक व्यवहार राज्यमंत्रीही करण्यात आले. ते सध्या जयपूर ग्रामीणचे खासदारही आहेत.