Lionel Messi : 'बर्थडे बॉय' मेस्सीच्या एनर्जीचं रहस्य, 'ही' ड्रिंक आहे स्टार खेळाडूचं सीक्रेट?
हे ड्रिंक लिओनेल मेस्सी याच्यासह अर्जेंटिना संघातील खेळाडूंचं आवडतं पेय आहे. ही ड्रिंक अर्जेंटिनाच्या संघासाठी अतिशय खास आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही खास ड्रिंक फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 वेळीही खूप चर्चेत आली होती.
फिफा विश्वचषकावेळी या ड्रिंकचा 5 क्विंटलचा साठा घेऊन अर्जेंटीना संघ पोहोचला होता. या फोटोमध्ये मेस्सीच्या हातामध्ये दिसणारी ही ड्रिंक खूप खास आहे.
या खास पेयाचं (Drink) नाव येरबा माटे (Yerba Mate) असं आहे. येरबा माटे एक हर्बल ड्रिंक (Harbal Drink) आहे. हे पेय अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे.
हे पेय यरबा माटे नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येतं. यरबा माटे ही दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारी एक विशेष प्रकारची वनस्पती आहे.
येरबा माटे (Yerba Mate Drink) एक प्रकारचा चहा आहे. याला एक खास प्रकारचा काढाही म्हणता येईल.
लौकी नावाच्या पारंपारिक भांड्यामध्ये हे येरबा माटे ड्रिंक पिण्याची पद्धत आहे. यामध्ये एक स्ट्रॉ असते. यरबा माटे नावाच्या वनस्पतीची पाने पाण्यामध्ये उकळवून हे पेय तयार केलं जातं.
लौकी नावाच्या भांड्यामध्ये हे ड्रिंक उकळवतात, त्यामध्ये एक जाळीदार स्ट्रॉ असते. त्यामुळे स्ट्रॉमधून पानं गाळून तुम्हाला हे ड्रिंक प्यायला मिळतं.
अर्जेंटीनासोबतच पराग्वे, उरुग्वे, ब्राजीलच्या खेळाडूंमध्येही हे पेय खूप प्रसिद्ध आहे.
हे खेळाडू या ड्रिंकचा साठा सोबत ठेवतात. खेळाडू मॅचदरम्यान सरावादरम्यान आणि मॅचनंतरही हे ड्रिंक पिताना दिसतात.
मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या खेळांडूचा उत्साह आणि एनर्जीमागे हेच कारण असल्याचं म्हटलं जातं.