Sunil Chhetri Retirement: मॅच पाहायला आली, प्रशिक्षकाची मुलगी निघाली, मग...; सुनील छेत्रीची आहे अनोखी लव्हस्टोरी!
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली आहे. आज सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सुनील छेत्रीने याबाबत माहिती दिली. (social media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे सुनील छेत्रीने सांगितले. (social media)
सुनील छेत्रीला त्याच्या या प्रवासात पत्नी सोनम भट्टाचार्यची देखील खूप साथ मिळाली. (social media)
सुनील छेत्रीची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. तो प्रशिक्षकाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. सुनीलच्या पत्नीचे नाव सोनम भट्टाचार्य आहे.(social media)
सोनम नेहमीच सुनीलची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम राहिली आहे. सोनम ही फुटबॉल प्रशिक्षक सुब्रतो भट्टाचार्य यांची मुलगी आहे.(social media)
सुनील छेत्री आणि सोनम भट्टाचार्य यांनी 2017 मध्ये लग्न केले. पण लग्नाआधी दोघांनीही एकमेकांना बराच काळ डेट केलं होतं.(social media)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम आणि सुनील यांची पहिली भेट कोलकातामध्ये एका मॅचदरम्यान एका म्युच्युअल फ्रेंडद्वारे झाली होती. या भेटीनंतर दोघेही मित्र झाले.(social media)
सुनील आणि सोनम एका मुलाचे पालक आहेत. त्यांच्या मुलाचे नाव ध्रुव आहे.(social media)
6 जूनला अखेरचा सामना खेळणार-भारत आणि कुवेत यांच्यात विश्वचषक पात्रता फेरीचा सामना 6 जून रोजी होणार आहे. सुनील छेत्रीचा हा शेवटचा सामना ठरणार आहे. सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चमकदार राहिलेली आहे. सुनील छेत्रीने भारतासाठी 145 सामने खेळले. 20 वर्षांच्या या कारकिर्दीत त्याने 93 गोल केले. (social media)
सुनील छेत्री भावूक-सुनील छेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो निवृत्तीची घोषणा करताना खूपच भावूक असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील छेत्रीने पदार्पणाच्या सामन्याची आठवण काढली. याशिवाय तो त्याच्या सुखी सरांबद्दल सांगताना दिसतो. खरे तर सुनील छेत्रीच्या पहिल्या सामन्यात सुखी सर प्रशिक्षक होते. सुनील छेत्री म्हणतो की, तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील भावनांचे वर्णन करू शकत नाही. त्या सामन्यात मी माझा पहिला गोल केला. विशेषत: जेव्हा मी टीम इंडियाची जर्सी घातली होती, तेव्हा एक वेगळीच अनुभूती होती, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, असं सुनील छेत्रीने सांगितले. (social media)