दिनेश कार्तिक ते विनोद कांबळीपर्यंत 'या' खेळाडूंनी घटस्फोटानंतर केलं दुसरं लग्न
भारतीय क्रिकेट संघातील असे काही खेळाडू आहेत ज्यांचं पहिलं लग्न काही कारणास्तव यशस्वी झालं नाही. मात्र दुसरं लग्न करुन हे क्रिकेटर आता आनंदी जीवन जगत आहेत. अशा पाच खेळाडूंविषयी जाणून घेऊयात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संघाचा खेळाडू विकेट कीपर दिनेश कार्तिकचं पहिलं लग्न निकितासोबत झालं होतं. मात्र निकिता आणि त्याचा मित्र क्रिकेटर मुरली विजय यांचं लव्ह अफेयर उघडकीस आल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2015मध्ये दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश प्लेअर दीपिका पल्लकल या दोघांनी लग्न केलं.
भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाज विनोद कांबळीनं आपली बालपणीची मैत्रिण नियोल लुईस हिच्याशी लग्न केलं होतं. मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विनोद कांबळीनं मॉडेल असलेल्या एंड्रिया हेविटशी लग्न केलं.
टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननं दोन लग्न केली आहेत. पहिलं लग्न त्यानं नौरीन हिच्याशी केलं. दोघांचा 1996 मध्ये तलाक झाला. त्यानंतर त्यानं अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत लग्न केलं. मात्र हे लग्न देखील टिकलं नाही. 2010 मध्ये दोघांनी सोडचिठ्ठी घेतली.
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथनं पहिलं लग्न जोत्सनाशी केलं होतं. 2007 मध्ये आठ वर्षांच्या संसारानंतर दोघं वेगळे झाले. त्यानंतर श्रीनाथनं पत्रकार माधवी पत्रावली यांच्याशी लग्न केलं.
क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंह देखील क्रिकेटर होते. त्यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांनी पहिली पत्नी शबनम होती, जी युवराज सिंहची आई आहे. योगराज आणि शबनम यांनी सोडचिठ्ठी घेतली. यानंतर योगराज यांनी सतवीर कौर यांच्याशी लग्न केलं.