विराट कोहलीचे हे विक्रम मोडणं कठीण, पाहा किंगचे सहा रेकॉर्ड
टी20 क्रिकेटमध्ये एकही चेंडू न टाकता विकेट घेण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2011 मध्ये इंग्लंडविरोधात विराट कोहली करिअरमधील पहिले षटक टाकण्यास आला. विराट कोहलीने टाकलेला चेंडू पंचांनी वाईड दिला. पण एमएस धोनीने त्या चेंडूवर केविन पीटरसनला स्टम्पिंग बाद केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहलीने कसोटीत कर्णधार असताना सात द्विशतके ठोकली आहेत. असा करणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. श्रीलंका 2, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात द्विशतक ठोकली आहेत.
सर्वात वेगवान 10 हजार धावांचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 205 डावात दहा हजार धावांचा पल्ला पर केला. विराट कोहलीने 10 वर्षांत 10 हजार धावांचा रेकॉर्ड तोडलाय.
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना 27 शतके ठोकली आहेत.
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 5786 धावा केल्या आहेत. वनडेमधील त्याच्या एकूण धावांच्या 42.78 टक्के धावा पाठलाग करताना काढल्या आहेत.
कर्णधार असताना सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू आहे. विराट कोहलीने भारताला 68 कसोटी सामन्यात 40 विजय मिळवून दिलाय. SENA देशात सात कसोटी जिंकणारा विराट एकमेव आशियाई कर्णधार आहे.