Ind vs NZ, 2nd Test : मुंबई कसोटीमध्ये विराट कोहली शून्यावर बाद, नको ते विक्रम नावावर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतासाठी खास ठरला नाही. कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. विराट पंचाच्या चूकीच्या निर्णयामुळे बाद झाल्याची मोठी चर्चा आहे. पण असे असले तरी या विकेटमुळे नको ते विक्रम विराटच्या नावावर झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विराट कोहली यावेळी बाद झाल्यामुळे मायदेशात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय कर्णधार बनला आहे. तो सहाव्या वेळेस बाद झाला असून याआधी हा रेकॉर्ड पतोडी यांच्या नावावर होता, ते पाच वेळा शून्यावर बाद झाले होते.
कोहली या सामन्यात शून्यावर बाद झाल्यामुळे क्रिकेट जगतात कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा बाद होण्यात विराट दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथसोबत दुसऱ्या स्थानावर आला आहे. पहिल्या स्थानी न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग हा आहे.
या विकेटमुळे कोहली न्यूझीलंड संघाविरुद्ध शून्यावर 14 व्यांदा बाद झाला आहे.
पहिल्या दिवशीचा खेळ अखेर संपला असून महत्त्वाचे फलंदाज गमावल्यानंतरही मयांकच्य शतकाच्या जोरावर भारताने 4 विकेट्सच्या बदल्यात 221 धावा केल्या आहेत.