कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 500 विकेट्स घेणारा गोलंदाज कोण?

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीत 800 विकेट्स घेतल्या आहेत. मुरलीधरनची गोलंदाजीची सरासरी 22.72 आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक 22 धावा खर्च केल्यानंतर त्याला एका विकेट मिळाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शेन वार्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. वार्ननं त्याच्या कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 25.41 इतकी आहे. याच वर्षी शेन वार्नचं हृदयविकारच्या झटक्यानं निधन झालंय. शेन वार्नचं अचानक सोडून जाणं क्रिडाविश्वासाठी मोठा धक्का होता.

या यादीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अँडरसननं आतापर्यंत 646 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 26.52 इतकी आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे यांचा चौथा क्रमांक लागतो. कुंबळेनं आपल्या कसोटी कारकिर्दीत 29.65 च्या गोलंदाजीच्या सरासरीनं 619 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा या यादीत टॉप-5 मध्ये आहे. मॅकग्राच्या नावावर 563 विकेट आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 21.64 इतकी आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 541 विकेट्स आहेत.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्स हा 500 कसोटी विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज होता. त्याच्या नावावर 24.44 च्या गोलंदाजीच्या सरासरीनं 519 विकेट्स आहेत.