In Pics : बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडिया सज्ज, कसून सुरु आहे सराव, पाहा फोटो
टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावर पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसह दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
उद्या म्हणजेच रविवारपासून (4 डिसेंबरपासून) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे आणि 14 ते 26 डिसेंबरदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया बांगलादेशला पोहोचली देखील असून सध्या कसून सराव करत आहे.
बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत.
या फोटोंमध्ये टीम इंडियाचे सर्वच खेळाडू मैदानात घाम गाळताना दिसत आहेत.
प्रशिक्षक राहुल द्रविडही सर्वांवर बारकाईनं लक्ष देत त्यांच्याकडून सराव करुन घेत आहे.
विराट, रोहित हे दिग्गज संघात परतल्याने दमदार खेळ पाहायला मिळू शकतो.
विशेष म्हणजे शिखर आणि रोहित बऱ्याच दिवसानंतर मैदानात परतल्याने दोघांची हिट जोडी सलामीला येऊ शकते.
भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामीला खांद्याच्या दुखापतीमुळं या मालिकेतून वगळण्यात आलं असून त्याच्या जागी उमरान मलिकचा संघात समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे नेमकी अंतिम 11 कशी असेल हे पाहणं औत्सक्याचे राहिल.
सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.