In Pics : टीम इंडिया निर्णायक लढतीसाठी सज्ज, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध मैदानात, कसून सराव सुरु
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज म्हणजेच बुधवारी (1 फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही निर्णायक लढत रंगणार आहे.
तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत जो कोणी जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल.
तर या निर्णायक मॅचपूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला आहे. सर्वच खेळाडूंनी मैदानात घाम गाळला असून बीसीसीआयनं फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये खेळाडू सराव करत असून कोचिंग स्टाफ त्यांचा सराव घेत आहेत.
सामना होणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाज दमदार कामगिरी करताना दिसून आले आहेत. 6 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 10 वेळा 150+ धावा केल्या आहेत.
यामध्ये, 5 वेळा संघांनी 180+ चा स्कोअर ओलांडला आहे. येथे सर्वोच्च धावसंख्या 224 धावांची आहे. फलंदाजांसाठी फायद्याच्या या विकेटवर 1 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
आतापर्यंत येथे झालेल्या 6 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकले असले तरी ते एकतर्फी पद्धतीने जिंकले. अशा परिस्थितीत येथे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
सामन्यादरम्यान अहमदाबादचे हवामान क्रिकेट खेळण्यासाठी अगदी योग्य असेल. तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. पावसाचीही शक्यता नाही. अशा स्थितीत सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.