IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यांसाठी भारत सज्ज, कोणत्या खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार असून भारतीय संघातील कोणत्या खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असू शकते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल गाजवल्यानंतर आता वेगवान युवा गोलंदाज उम्रान मलिकला (Umran Malik) थेट भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधलेला उमरान आता भारतीय संघासाकडून आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी एक युवा गोलंदाज अर्थात अर्शदीप सिंहला देखील भारतीय संघाचं तिकीट मिळालं असून त्याच्या गोलंदाजीकडेही अनेकांचे लक्ष आहे.
डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंहला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळेल का? आणि मिळाल्यास तो कशी गोलंदाजी करेल हे पाहावे लागेल.
आयपीएल 2022 स्पर्धेत हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्त्वाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. हार्दिकच्या नेतृत्तवाखालीच गुजरात टायटन्सने आयपीएलचा चषक जिंकला असून त्यानंतर लगेचच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी हार्दिकची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे.
त्यामुळे या सामन्यांवेळी हार्दिकचा फॉर्म चांगला असेल का? तो गोलंदाजीतही कमाल करेल का? अशा साऱ्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीसाठी अगदी तुफान फटकेबाजी करत फिनिशर म्हणून नावारुपाला आलेल्या दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) बऱ्याच काळानंतर भारतीय संघात स्थान मिळालं आहे.
त्याने आयपीएलमध्ये तर 16 सामन्यात 183.33 स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. आता असाच फॉर्म तो टीम इंडियासाठीही कायम ठेवतो का? हे पाहावे लागेल.
भारताचा आणखी एक युवा खेळाडू ज्याच्याकडे अनेकांचे लक्ष असेल तो म्हणजे सलामीवीर ऋतुराज गायकवाड. आयपीएल 2021 मध्ये तुफान फलंदाजीनंतर टीम इंडियात निवड होऊनही अधिक संधी न मिळाल्याने गायकवाड हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही.
आतातरी त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळणार का? आणि मिळाल्यास कशी कामगिरी करेल, याकडे अनेकांचे लक्ष आहे.