Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
'टीम इंडिया डरपोक नाही...'; हेड कोच द्रविडनं सांगितलं वर्ल्डकप गमावण्याचं सर्वात मोठं कारण
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधात 6 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑसी संघानं सहाव्यांदा वर्ल्डकप उंचावलाय, तर टीम इंडियाचं तिसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलंय
टीम इंडियाच्या पराभवानंतर हेड कोच राहुल द्रविडनं पत्रकार परिषद घेतली.
द्रविडनं फायनलमध्ये संघाच्या पराभवावर भाष्य केलं, तसेच काही कारणंही सांगितली
द्रविड म्हणाला की, आम्ही स्पर्धेत अजिबात दबावाखाली किंवा घाबरत खेळलेलो नाही. त्यामुळे या वक्तव्याशी मी अजिबात सहमत नाही. आम्ही फायनलमध्ये पहिल्या 10 ओव्हरमध्ये 80 धाव्या केल्या. जेव्हा विकेट्स जातात, त्यावेळी अनेकदा तुम्हाला रणनिती बदलावी लागते. ग्रुप सामन्यांमध्ये इग्लंडविरोधात सुरुवातीला विकेट्स गमावल्यानंतर आम्ही आमची रणनिती बदलली होती.
द्रविड म्हणाला की, आम्ही आक्रमक सुरुवात करत होतो, पण तुम्हाला कधीकधी काही पावलं मागे यावं लागतं. ही फायनल आम्ही घाबरुन खेळलेलो नाही. मधल्या काही ओव्हर्समध्ये त्यांनी खरंच चांगली गोलंदाजी केली आणि आपण आपले तीन विकेट्स गमावले.
द्रविड पुढे म्हणाला की, जेव्हाही आम्ही विचार केला की, आम्ही आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळणार आहोत, आम्ही विकेट गमावल्यात आणि पुन्हा सांभाळून खेळावं लागलं. जेव्हाही विकेट गेला आणि पार्टनरशीप तुटली, आम्हाला रिबिल्ड करावं लागलं.
द्रविडनं सांगितलं की, त्यांच्या फलंदाजीमध्येही आम्ही पाहिलं की, मार्नस आणि हेडनं पार्टनरशिप केली. त्यांनी आपले विकेट्स गमावले नाहीत आणि ते पुढे गेले. पण जर विकेट्स गेल्या, तर पुन्हा पार्टनरशिप बिल्ड करावी लागते.
योगायोग असा की, वर्ल्डकपची सांगती झाली आणि टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. आता BCCI द्रविडचा करार वाढवणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.